Thursday, 26 November 2026 08:46:43 PM
समाज

नियतीचा खेळ म्हणावा की दुर्दैवी योगायोग! जावयाच्या निधनाने व्यथित झालेल्या सासूचाही जावयाच्या अंत्यविधीदरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जळगावच्या बळीराम पेठ परिसरात घडली.

जळगाव : नियतीचा खेळ म्हणावा की दुर्दैवी योगायोग! जावयाच्या निधनाने व्यथित झालेल्या सासूचाही जावयाच्या अंत्यविधीदरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जळगावच्या बळीराम पेठ परिसरात घडली. काही तासांच्या अंतराने एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
बळीराम पेठेतील मलिक पार्क येथील रहिवासी मसूद शेख नवाज (वय ५९) यांचे ९ नोव्हेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. जावयाच्या अंत्यविधीसाठी पुण्याहून त्यांच्या सासू शकीला सलीम खान या १० नोव्हेंबर रोजी सकाळी जळगावात आल्या होत्या.

दरम्यान, सकाळी ११ वाजता मसूद शेख यांच्या अंत्ययात्रेची तयारी सुरू असताना शकीला खान यांची अचानक प्रकृती खालावली. नातेवाईकांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचीही प्राणज्योत मालवली.
एकीकडे जावयाचा अंत्यविधी सुरू असताना दुसरीकडे सासूच्या निधनाची बातमी आल्याने नातेवाईकांना मोठा धक्का बसला. या घटनेने बळीराम पेठ परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या