जळगाव शहरात होणार एक मिनी रिंग रोड आ सुरेश भोळे राजू मामा
महाराष्ट्र शासनाच्या अधिवेशनादरम्यान शहरातील प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी आपण हा निधी मंजूर करून घेतला होता. या सर्व प्रक्रियेत माननीय देवेंद्रजी फडणवीस, बँकामंत्री शिवेंद्रराजे भोसले तसेच नामदार गिरीष भाऊ महाजन व नामदार गुलाब भाऊ पाटील यांचे अमूल्य सहकार्य लाभले.
याच निधीतून शिव कॉलनी स्टॉपपासून शंभर फुटी रोडपर्यंतचा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. हा मार्ग संपूर्ण वाघनगर परिसर, पीरबाबा दर्गा तसेच गाडगेबाबा चौकाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे.
खऱ्या अर्थाने शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, याला आपण ‘मिनी रिंग रोड’ असे संबोधू शकतो. अशा या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे भूमिपूजन आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत होत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे.या कार्यक्रमाला महापौर दीपमाला ताई काळे, उपमहापौर मनोज चौधरी सभापती डॉ चंद्रशेकर पाटील, त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक अकराचे नगरसेवक माननीय सिंधूताई कोल्हे, माननीय ललित भाऊ कोल्हे, संतोष पाटील आणि आम्रुताताई सोनवणे तसेच प्रभाग क्रमांक सातचे नगरसेवक चंद्रशेकर, अंकिता पाटील आणि विशाल भोळे भाजप जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सूर्यवंशी तसेचसदर या कार्यक्रमाप्रसंगी
शिवकॉलनी परिसरातील प्रा डॉ नितीन बारी मनोज सावंत सर
मनोज भांडारकर बंटी नेर पगारे
भिकन हिवराडे योगेश पाटील
मनोज देवरे आनंद साळी
संदीप जगताप प्रीतम गुजर
फकिरा वाणी व ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते
परिसरातील इतर नागरिक आणि युवा मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील नागरिकांची वाहतुकीची मोठी सोय होणार असून, शहराच्या दळणवळण व्यवस्थेलाही निश्चितच चालना मिळणार आहे.
या कामासंदर्भात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या ठिकाणी भूमिगत गटारांचे काम अद्याप बाकी आहे, ते काम येत्या दोन दिवसांत सुरू करण्यात येईल. भूमिगत गटारांचे काम पूर्ण होताच रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला तातडीने सुरुवात करण्यात येईल.
आपला उद्देश केवळ रस्ता तयार करणे एवढाच नसून, नागरिकांना दर्जेदार रस्ते, चांगल्या सुविधा आणि नियोजनबद्ध विकास उपलब्ध करून देणे हा आहे
असे याप्रसंगी सांगितले