घरगुती वादातून मुलाकडून आईला मारहाण; उपचारादरम्यान ७३ वर्षीय महिलेचा मृत्यू
धरणगाव : धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडे गावात घरगुती कारणावरून मुलाने आईला मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या ७३ वर्षीय सारीबाबी रसूल पटेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
धरणगाव पोलीस स्टेशनपासून जळगाव रोडवर पूर्वेकडे सुमारे १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या हनुमंतखेडे येथे ही घटना घडली. याप्रकरणी आईला मारहाण केल्याच्या आरोपावरून मुलगा रशीद रसूल पटेल (वय ५५) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घटनेमुळे परिसरात शांतता असून पुढील तपास धरणगाव पोलीस करीत आहेत.