Thursday, 26 November 2026 08:24:33 PM
गुन्हे

भुसावळ तालुका पोलिसांची एम.डी. ड्रग्जविरोधात मोठी कारवाई! ६२.२१ ग्रॅम मेफेड्रोन (MD) जप्त; चौघांना अटक, ₹७.२८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

भुसावळ तालुका पोलिसांची एम.डी. ड्रग्जविरोधात मोठी कारवाई!  ६२.२१ ग्रॅम मेफेड्रोन (MD) जप्त; चौघांना अटक, ₹७.२८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

भुसावळ तालुका पोलिसांची एम.डी. ड्रग्जविरोधात मोठी कारवाई!

६२.२१ ग्रॅम मेफेड्रोन (MD) जप्त; चौघांना अटक, ₹७.२८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जळगाव जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत भुसावळ तालुका पोलिसांना मोठे यश

भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील किन्ही एमआयडीसी परिसरात पोलिसांनी आज दिनांक ०६ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ०२:५५ वाजता छापा टाकून मेफेड्रोन (MD) या अंमली पदार्थाची विक्री व ताबा असल्याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एकूण ६२.२१ ग्रॅम एम.डी. पावडर, दोन मोटारसायकली आणि चार मोबाईल हँडसेट असा एकूण ₹७,२८,८४०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

१. दाखल गुन्हा

भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. क्र. २२६/२०२६, NDPS कायदा कलम ८(क), २२(क), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२. ताब्यातील आरोपी

१. रिशभ कुणाल खेडकर (वय १८, रा. कंडारी, भुसावळ)
२. प्रथमेश दिलीप आव्हाड (वय २७, रा. दादासाहेब रुपवते सोसायटी, भुसावळ)
३. शेख अफजल शेख रहेमतुल्ला (वय २६, रा. नसरंजी फाईल, भुसावळ)
४. असगरखान अनवरखान (वय ५७, रा. अयान कॉलनी, भुसावळ)

३. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

* एम.डी. (Mephedrone) पावडर: ६२.२१ ग्रॅम, किंमत ₹२,४८,८४०/- (व्यापारी मात्रा / Commercial Quantity). यापैकी असगरखान याच्याकडून ५५.३३ ग्रॅम एम.डी. हस्तगत.
* मोटारसायकली: ०२ (रॉयल एनफिल्ड बुलेट व पल्सर), किंमत ₹३,२५,०००/-.
* मोबाईल हँडसेट्स: ०४ (iPhone 16, iPhone 13, Tecno व Redmi), किंमत ₹१,५५,०००/-.

एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹७,२८,८४०/- आहे.

५. कारवाई करणारे पथक

श्री. प्रशांत दरेकर, परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी तथा प्रभारी अधिकारी, भुसावळ तालुका यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

जळगाव जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई सुरू असून, अशा अवैध व्यवसायात सहभागी असणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. अंमली पदार्थमुक्त जळगाव जिल्ह्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे.



संबंधित बातम्या