Monday, 12 October 2026 03:21:51 AM
गुन्हे

पाचोरा:५ लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेला गॅलरीवरून खाली ढकलले

पाचोरा:५ लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेला गॅलरीवरून खाली ढकलले

विवाहिता गंभीर जखमी ; पती व सासूविरुद्ध गुन्हा

पाचोरा प्रतिनिधी ) – पाचोरा शहरातील राजीव गांधी कॉलनी येथे विवाहितेला पाच लाख रुपये माहेरहून आणण्याची मागणी करत मानसिक व शारीरिक छळ करून गॅलरीतून खाली ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली असून याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती आणि सासूविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पूजा संदीप कानडे (वय २७, रा. राजीव गांधी कॉलनी, पाचोरा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २६ जुलैच्या रात्रीपासून २७ जुलैच्या सकाळपर्यंत पती संदीप नारायण कानडे व सासू मंगल नारायण कानडे यांनी ऑनलाइन सेंटरसाठी माहेरहून ₹५ लाख आणण्याची मागणी केली. मागणी पूर्ण न झाल्याने फिर्यादीला शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करत जीवे मारण्याच्या उद्देशाने गॅलरीतून खाली ढकलून दिल्याने

या घटनेत फिर्यादीच्या डाव्या हाताला, डाव्या पायाला व कंबरेला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले. त्यांच्यावर पाचोरा येथील वृंदावन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून तेथील जबाबानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

संबंधित बातम्या