निवडणूक प्रक्रियेत सत्तेचा, पैशाचा आणि बळाचा वापर करून अनेक जागा बिनविरोध करण्यात आल्याचा आरोप करत उर्वरित नऊ जागांसाठी मतदारांना आर्थिक प्रलोभने व दादागिरी केली जात असल्याचे महाविकास आघाडीने म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे आणि निवडणूक प्रक्रिया स्थगित करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी अशोक लाडवंजारी, राजू मोरे, अमोल कोल्हे, किरण राजपूत, सुनील भैय्या माळी, गिरीश सांगळे, गणेश पाटील, राहुल भालेराव, रफीक पटेल, सुहास चौधरी, अबजेत खाटीक, इब्राहिम खान यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.