Friday, 27 November 2026 09:25:13 PM
इलेक्शन

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीसाठी महायुती सज्ज!

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीसाठी महायुती सज्ज! 

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भाजपा-महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली.

यावेळी आगामी निवडणुकीचे नियोजन, रणनीती व समन्वय यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच महायुतीचे १२ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याबद्दल सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले.

 यावेळेस राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.गुलाबराव पाटील, राज्याचे वस्त्रद्योग मंत्री श्री.संजय सावकारे, भाजपा प्रदेश चिटणीस सौ.भैरवी ताई वाघ,आमदार श्री. सुरेश दामू भोळे-राजू मामा, आमदार श्री.मंगेशदादा चव्हाण, आमदार श्री. चंद्रकांत सोनवणे, आमदार श्री. अमोलदादा जावळे, विधान परिषद आमदार श्री. नंदकिशोर महाजन, महापौर सौ. दीपमाला काळे, माजी मंत्री श्री. गुलाबरावजी देवकर, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, माजी जिल्हा बँक चेअरमन श्री. संजय पवार, भाजपा महानगराध्यक्ष श्री.दीपक सूर्यवंशी, भाजप जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष श्री.चंद्रकांत बाविस्कर, भाजप जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी,भाजपा महानगर जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, नितीन इंगळे, राहुल वाघ, मनपा स्थायी समिती सभापती डॉ.चंद्रशेखर पाटील,भाजपा गटनेते श्री. प्रकाश जी बालाणी,शिवसेना महानगरप्रमुख श्री.विष्णू भंगाळे, श्री. सुमित किशोरआप्पा पाटील आणि सौ. प्रतिभाताई शिंदे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महायुतीची एकजूट, सहकार क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध

संबंधित बातम्या