Friday, 27 November 2026 09:38:01 PM
गुन्हे

जळगाव महापालिकेत ४२.६० कोटींच्या कथित अपहारावरून खळबळ! अटलांटा कंपनीला वाचवतेय कोण? आर्थिक गुन्हे शाखेला कागदपत्रे देण्यास प्रशासनाची टाळाटाळ? सभागृहात नगरसेवक अरविंद देशमुख यांचा संतप्त सवाल!

जळगाव महापालिकेत ४२.६० कोटींच्या कथित अपहारावरून खळबळ! अटलांटा कंपनीला वाचवतेय कोण? आर्थिक गुन्हे शाखेला कागदपत्रे देण्यास प्रशासनाची टाळाटाळ? सभागृहात नगरसेवक अरविंद देशमुख यांचा संतप्त सवाल!

जळगाव महापालिकेत ४२.६० कोटींच्या कथित अपहारावरून खळबळ! अटलांटा कंपनीला वाचवतेय कोण?
आर्थिक गुन्हे शाखेला कागदपत्रे देण्यास प्रशासनाची टाळाटाळ? सभागृहात नगरसेवक अरविंद देशमुख यांचा संतप्त सवाल!


जळगाव : जळगाव महापालिकेतील अटलांटा कंपनीच्या कथित ४२ कोटी ६० लाख ७६ हजार ५६२ रुपयांच्या अपहारप्रकरणाने पुन्हा एकदा राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू असतानाही, तपासासाठी आवश्यक कागदपत्रे महापालिका प्रशासनाकडून पोलिसांना उपलब्ध करून दिली जात नसल्याचा गंभीर आरोप सभागृहात करण्यात आला.
१ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल, तरी कागदपत्रे कुठे अडकली?
अटलांटा कंपनीशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी १ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, तपासाच्या दृष्टीने महापालिकेकडील महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत. मात्र, वारंवार पत्रव्यवहार करूनही ही कागदपत्रे तपास यंत्रणेला दिली जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
नगरसेवक अरविंद देशमुख यांचा प्रशासनाला थेट सवाल!
सभागृहात नगरसेवक अरविंद देशमुख यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आर्थिक गुन्हे शाखेकडून वारंवार मागणी होऊनही कागदपत्रे दिली जात नसतील, तर नेमके कोणाच्या दबावाखाली हा प्रकार सुरू आहे? अटलांटा कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न कोण करत आहे? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
जळगावकरांच्या पैशांचा हिशेब कोण देणार?
४२ कोटी ६० लाखांहून अधिक रकमेच्या कथित अपहाराचा विषय असताना तपासाला आवश्यक कागदपत्रे देण्यास विलंब का होत आहे, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने सर्व संबंधित कागदपत्रे आर्थिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द करावीत आणि तपासात सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
आता या प्रकरणात महापालिका प्रशासन काय भूमिका घेते आणि आर्थिक गुन्हे शाखेचा तपास कोणत्या दिशेने जातो, याकडे संपूर्ण जळगावकरांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या