बालगृहातील मुले: आशेचा एक किरण, बालगृहातील मुलांना गुणगौरव प्रशस्तीपत्रक तसेच बालगृह ढोल ताशा पथकास बक्षीसाचे वाटप व मुलींच्या शिक्षणाकरीता शिलाई मशीन व भेटवस्तुंचे वाटप
दिनांक 14 आक्टोंबर 2026 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव, जिल्हाधिकारी, जळगांव व बाल न्यायमंडळ तसेच समिती, जळगांव यांचे संयुक्त विद्यमाने बालगृहातील मुलांना गुणगौरव प्रशस्तीपत्रकाचे तसेच बालगृह ढोल ताशा पथकास बक्षीसाचे वाटप व मुलींच्या शिक्षणाकरीता शिलाई मशीन व भेटवस्तुंचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन मा. श्री. आर. एन. जोशी, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जळगांव व मा. रोहन घुगे, जिल्हाधिकारी, जळगांव तसेच इतर मान्यवर यांचे शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रम हा जळगांव येथील बालगृह येथे कार्यक्रम पार पडला. सदरील कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1, श्री. एस.व्ही.खोंगल, श्रीमती प्रिया बनकर, जिल्हा न्यायाधीश-3, जिल्हा न्यायाधीश-6 श्री आर. एस. साळगांवकर, मुख्य न्यायदंडाधिकारी, जळगांव, श्री. आर. टी. घोगले, मा. श्री. सुरेंद्र काबरा, जिल्हा सरकारी अभियोक्ता, जळगांव, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव श्री. एन.एस. बुद्रुक, श्रीमती एम. व्ही. निंबाळकर, 5 वे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, जळगांव, शासकीय औद्योगीक संस्थेचे प्राचार्य श्री. कुलकर्णी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी श्री. ऋषीकेश काळे, बालसुधार गृहाचे अधिक्षक श्री. अहिरराव जिल्हा न्यायालयाचे सहा. अधिक्षक निलेश सुर्यवंशी, वरिष्ठ लिपीक,श्री. ललीत चैधरी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी तसेच बालगृहाचे व बालन्यायमंडळाचे कर्मचारी उपस्थीत होते. या प्रसंगी श्री. आर. एन. जोशी, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जळगांव यांनी विदयाथ्र्यांना स्वावलंबनाचे तसेच शिक्षणाचे महत्व सांगीतले. मा. रोहन घुगे, जिल्हाधिकारी, जळगांव यांनी बालगृह ढोल ताशा पथकाच्या कार्यक्रमाची प्रशंसा केली व हा अनोखा तसेच स्तुत्य असा उपक्रम असल्याचे सांगीतले.