Saturday, 28 November 2026 01:08:20 AM
शिक्षण

प्रा. आर. व्ही. पाटील सर यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ

प्रा. आर. व्ही. पाटील सर यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ

प्रा. आर. व्ही. पाटील सर यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ

सेवा, समर्पण आणि ज्ञानदानाचा गौरवपूर्ण प्रवास!

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागातील आदरणीय *प्रा. आर. व्ही. पाटील सर* यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने विभागाच्या वतीने त्यांना सुंदर मोमेंटो व शाल प्रदान करून सन्मानपूर्वक गौरविण्यात आले. यावेळी त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

आदरणीय प्रा.आर. व्ही. पाटील सर यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात महाविद्यालयाच्या तसेच गोदावरी फाउंडेशनच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. ज्ञानदानाप्रती असलेली निष्ठा, विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता आणि सहकाऱ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यांमुळे त्यांनी सर्वांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे.

या प्रसंगी *गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय डॉ. उल्हास पाटील सर, सचिव आदरणीय डॉ. वर्षा पाटील मॅडम, संचालिका आदरणीय डॉ. केतकी पाटील मॅडम, संचालक आदरणीय डॉ. वैभव पाटील सर, संचालक आदरणीय  डॉ.अनिकेत पाटील सर व संचालिका डॉ.अक्षदा पाटील मॅडम* यांनी त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्यात..

या कार्यक्रमाप्रसंगी 
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. व्ही. एच. पाटील सर, तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे विभागप्रमुख आदरणीय डॉ. हेमंत इंगळे सर, विभागातील प्राध्यापक डॉ. ईश्वर जाधव सर, डॉ. व्ही. डी. चौधरी सर, डॉ. देवेंद्र मराठे सर व प्रा. हेमराज धांडे सर* आणि महाविद्यालयातील इतर विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

सर्व मान्यवरांनी प्रा. आर. व्ही. पाटील सर यांच्या संस्थेप्रती असलेल्या योगदानाचे कौतुक करून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आरोग्य, आनंद, समाधान आणि यशाच्या शुभेच्छा दिल्या.

नोकरीतून सेवानिवृत्ती हा एका प्रवासाचा शेवट नसून, स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ देत आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात असते. सरांनी आपल्या अनुभवातून आणि कार्यातून निर्माण केलेला आदर्श कायमच सर्वांसाठी प्रेरणादायी राहील.

संबंधित बातम्या