पंतप्रधान मा नरेंद्र भाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा संकल्प अभियान अंतर्गत मा कृषी उत्पन्न बाजार येथील कष्टकरी कामगारांसाठी भव्य आरोग्य शिबिर संपन्न
मुख्यमंत्री सहायता कक्ष महाराष्ट्र राज्य व भाजपा जळगाव जिल्हा महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार येथील कष्टकरी कामगारांसाठी आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न झाले
500 कामगारांची आरोग्य संदर्भात विविध तपासणी करण्यात आली सकाळी ९:३० वाजता शिबिराचे उदघाटन आ सुरेश भोळे राजू मामा यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरासाठी प्रमुख उपस्थिती भाजपा जिल्हध्यक्ष दीपक सूर्यवंशी, कृ उ बा सभापती लक्ष्मण पाटील, दंत महाविद्यालय अधिष्टाता डॉ वठार,मार्केट कृ उ बा संचालक अशोक राठी, दीपक परदेशी, डॉ.अरुण पाटील, मिलिंद चौधरी, योगराज सपकाळे, इंद्रराज सपकाळे, समाधान धनगर,संतोष इंगळे,विजय वानखेडे, कॉमेश सपकाळे, राजू मराठे व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्व कष्टकरी कामगारांची सर्व प्रकारच्या तपासणी, रक्ताची तपासन्या औषधी मोफत वाटप करण्यात आले. आरोग्य शिबिरात खालील प्रमाणे तपासणी करून औषधंपचार मोफत करण्यात आले. याप्रसंगी खालील तपासण्या करण्यात आल्या .हृदयरोग तपासणी,श्री रोग तपासणी,जनरल मेडिसिन
दाताची तपासणी, नेत्र डोळे तपासणी, नाक कान घसा, यूरोलॉजि , यासह अनेक तपासण्या करण्यात आल्या
शिबिरासाठी मुख्यमंत्री सहायता कक्ष महाराष्ट्र राज्य.,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव, शासकीय दंत महाविद्यालय जळगाव,महादेव हॉस्पीटल जळगाव यांचे सहकार्य लाभले.
शिबिराचे संयोजक पितांबर भावसार यांनी सूत्रसंचालन केले व आभार प्रदर्शन व्यापारी आघाडीचे अशोक राठी यांनी केले
शिबीर यशस्वीतेसाठी व्यापारा गाडी अध्यक्ष विनय बाहेती, संतोष पवार विष्णू कांत मणियार मनोज नागला सुनील तापडिया दीपक महाजन ,मुकेश कुकरेजा व व्यापारी आघाडीचे सर्व पदाधिकारी व हमाल मापाडी चे सर्व पदाधिकारी व जी एम फाउंडेशन यांनी परिश्रम घेतले.