Monday, 12 October 2026 03:20:55 AM
समाज

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता चार नव्या शहरांसाठी थेट विमानसेवा. जळगावकरांसाठीआनंदाची बातमी मुंबई जळगाव अंतर फक्त दीड तास

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता चार नव्या शहरांसाठी थेट विमानसेवा                                                                                                                
जळगाव : प्रतीनिधी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सिंधुदुर्ग, जळगाव, गोवा आणि लक्षद्वीपमधील अगत्ती या चार ठिकाणांसाठी फ्लाय 91 ची विमानसेवा सुरू होत आहे.अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. आज  हैदराबादहून थेट आलेल्या फ्लाय 91च्या पहिल्या विमानाचे मुंबई विमानतळावर जलतोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले. हा नजारा पाहण्यासारखा होता.
या चार शहरांना थेट विमानसेवेने जोडले जात असल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या सेवेमुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार असून, प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुखकर होणार आहे. जळगावकरांसाठी ही आतिशय आनंदाची बातमी आहे कारण मुंबई जळगाव अंतर फक्त दीड तास असणार असून जळगावकरांना या सेवेचा मोठा फायदा होणार आहे .

संबंधित बातम्या