जळगाव: महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्र (ASD/VSD/PDA प्रकार) असलेल्या दोन बालकांवर अत्याधुनिक डिव्हाइस क्लोजर पद्धतीने यशस्वी उपचार करण्यात आले.या शस्त्रक्रियेसाठी मुंबईतील अनुभवी पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट तज्ज्ञांचे सहकार्य लाभले. महादेव हॉस्पिटलचे डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजी) यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.पारंपरिक ओपन हार्ट सर्जरीऐवजी कॅथलॅबमध्ये चिरफाड न करता रक्तवाहिनीद्वारे विशेष डिव्हाइस हृदयापर्यंत पोहोचवून हृदयातील छिद्र बंद करण्यात आले. त्यामुळे रुग्णाला मोठी शस्त्रक्रिया करावी लागली नाही.या प्रक्रियेत मुंबईतील अपोलो हॉस्पिटलचे पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉ. भूषण चौहान, डॉ. धवल खखडे तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. इशान सय्यद यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
कॅथलॅब टेक्निशियन मोहम्मद सिद्दीकी यांनीही तांत्रिक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.डॉ. वैभव पाटील यांनी सांगितले की, जन्मजात हृदयातील छिद्राचे लवकर निदान करून योग्य वेळी उपचार केल्यास मुलांचे आयुष्य पूर्णपणे निरोगी राहू शकते. आधुनिक डिव्हाइस क्लोजर तंत्रामुळे:छाती उघडण्याची गरज पडत नाही,रक्तस्राव अत्यल्प होतो,वेदना कमी होतात,रुग्ण लवकर बरा होतो,अल्पावधीत घरी परतता येते.महादेव हॉस्पिटलमध्ये अशा अत्याधुनिक हृदयरोग उपचार सुविधा उपलब्ध असल्याचेही रुग्णालयाने नमूद केले.