लीनेस क्लब जलगाव ला प्रांत अध्यक्ष कल्पना देशमुख अकोला व क्षेत्रीय अध्यक्ष राखी अग्रवाल शिरपूर यांचा यशस्वी अधिकारी दौरा वर्षाला एकदा हा दौरा असतो आणि यावेळेस क्लब तर्फे अनेक सेवाभावी कार्यक्रम घेतले जातात यावेळेस जळगाव क्लब तर्फे कुसुंबा येथील मनोबल संस्थेमध्ये ब्रेल लिपीच्या दोन पुस्तक, दोन कुबड्या, दहा टी-शर्ट, दोन श्रावण यंत्र, अशा वस्तू प्रांत अध्यक्ष च्या हस्ते देण्यात आल्या यावेळी सोबत प्रांत कोषाध्यक्ष शितल अग्रवाल पूर्व प्रांत अध्यक्ष लता बनवट प्रेमलता खटोड अध्यक्ष रेखा वर्मा प्रतिभा सुराणा यांच्या उपस्थितीत या वस्तू देण्यात आल्या
नंतर कार्यक्रमांमध्ये दीप प्रज्वलापासून कार्यक्रमाची सुरुवात झाली सचिव निला चौधरी यांनी ध्वजवंदन गीत म्हटले प्रांताध्यक्ष व क्षेत्रीय अध्यक्षांनी क्लबच्या कार्यक्रमाची पाहणी केली क्लबद्वारे सर्व उपस्थितांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले .
प्रांत अध्यक्षांच्या हस्ते दोन गरजू व्यक्तींना शिलाई मशीन, पाच सायकली , अंगणवाडीत दोन चटाया , एक अपंगाची सायकल, आणि दोन कुबड्या अशा वस्तू देण्यात आल्या “आमच्या गरजेच्या वेळी क्लबच्या सदस्यांनी दिलेली ही मदत आमच्यासाठी खूप मोलाची आहे. आवश्यक वस्तू मिळाल्यामुळे आमच्या दैनंदिन जीवनात मोठी सोय होणार आहे. ही मदत केवळ वस्तूंची नसून आमच्यासाठी आधार आणि आत्मविश्वास देणारी आहे. समाजातील गरजू व्यक्तींच्या अडचणी समजून घेऊन मदतीचा हात पुढे करणाऱ्या सर्व सदस्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. अशा सेवाभावी उपक्रमांमुळे समाजात माणुसकी आणि आपुलकीची भावना अधिक दृढ होते. क्लबच्या पुढील सर्व सामाजिक उपक्रमांना आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा.”
अशा भावना
भेटवस्तू घेतलेल्या गरजूंनी प्रतिक्रिया नोंदविल्या .
इतके कार्यक्रम एका दिवसात घेण्याकरता प्रांत अध्यक्ष व क्षेत्रीय अध्यक्ष यांनी क्लब अध्यक्षा रेखा वर्मा यांचे भरभरून कौतुक केले व भेटवस्तू देऊ सत्कार सुद्धा करण्यात आला .
अध्यक्ष रेखा वर्मा यांनी सांगितले की क्लबच्या सर्व पूर्व अध्यक्ष आणि सर्व पदाधिकाराच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम इतका यशस्वी झाला आणि त्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
मान्यवरांचो उपस्थिती
नगरसेवक विशाल भोळे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहिली. पाचोरा क्लब चे अध्यक्ष जयश्री वाघ सेक्रेटरी सरला पाटील तसेच शिरपूरचे अध्यक्ष रूपाली अग्रवाल या सुद्धा आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित होत्या
या कार्यक्रमाकरिता आमदार राजू मामा भोळे, मीनल वर्मा येवला, नगरसेविका वैशाली पाटील, स्थायी समिती सभापती चंद्रशेखर पाटील, लता बनवट, राखी अग्रवाल, प्रेम लता खटोड, चंद्रकला सुराणा, नयनतारा बाफना, हुकमीच्यांची संकलेचा, प्रतिभा सुराणा, विजया बाफना, अनिता कांकरिया, यांचे विशेष सहकार्य लाभले
सूत्रसंचालन दर्शना ललवाणी यांनी केले
कार्यक्रमाचे आभार पूनम तिवारी हिने मानले
कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता रेश्मा बेहराणी सरिता कोठारी, संगीता श्री श्रीमाल,ललिता श्री श्री माळ
सुषमा फुलपगर अर्चना जाखेटे प्रिया दारा, दिल खुश सुराना मुनमुन मुनोत सुनिता बोथरा, उष्मा मेहता प्रेम लता डाकलीया यांनी परिश्रम घेतले
राष्ट्रगीत झाल्यानंतर सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली