सेवा संकल्प अभियान अंतर्गत भाजपा जळगाव महानगरातर्फे चित्रकला, वक्तृत्व, पथनाट्य व रांगोळी स्पर्धा उत्साहात
जळगाव : भारतीय जनता पार्टी जळगाव महानगराच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. रविवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी जळगाव येथील गांधी उद्यान येथे इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा व रांगोळी स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोदजी तावडे, जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन, जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, चाळीसगावचे आमदार मंगेशदादा चव्हाण, रावेर मतदारसंघाचे आमदार अमोलदादा जावळे यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमालाताई काळे जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, संतोष इंगळे, निलेश झोपे, राजू नन्नवरे, विजय वानखेडे, महिला मोर्चाच्या नीताताई परदेशी, नगरसेवक गायत्री राणे,विजय बांदल, राजू मराठे, आनंद सपकाळे, विनोद मराठे, उमेश देशपांडे, विशाल पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा महानगर संयोजक दीपक परदेशी यांनी पुढाकार घेऊन केले. वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेचे संयोजक पदवीधर प्रकोष्ठाचे शिरीषकुमार तायडे यांनी केले, तर पथनाट्य व शासकीय योजनांच्या जनजागृती कार्यशाळेचे संयोजन भाजपा जिल्हा चिटणीस भूषण लाडवंजारी यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक परदेशी यांनी केले. प्रास्ताविक शिरीषकुमार तायडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन भूषण लाडवंजारी यांनी केले.
चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. वक्तृत्व स्पर्धेसाठी कुतूहल फाउंडेशनचे अध्यक्ष महेश गोरडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
सकाळी ९ ते ११ या वेळेत झालेल्या या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चित्रकला स्पर्धेत जळगाव शहरातील विविध विद्यालयांमधील तब्बल ४५० विद्यार्थ्यांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत ४५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे आणि वक्तृत्व कौशल्याचे प्रभावी सादरीकरण केले.
स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित शिक्षकांचे आयोजकांच्या वतीने स्वागत व अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, वक्तृत्वकौशल्य, सामाजिक भान आणि शासकीय योजनांबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उत्साहात समारोप झाला.